Job  Job
पुणे

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २४ ः स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या टप्प्यांवर यश मिळवले आहे, मात्र कोणतेही पद मिळाले नाही, म्हणून नोकरीच्या शोधात असाल तर, ही माहिती तुमच्यासाठीच आहे. (Job opportunities for students preparing for government Exam)

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणे, हे अशक्यच आहे. या परीक्षेत अपयश आले म्हणजेच आपण आयुष्यात सर्वकाही गमावले, अशी अनेकांची अवस्था झालेली पाहायला मिळते. स्पर्धा परीक्षेचा उमेदवार हा हुशार आणि विचार करणारा असतो. त्याने विविध विषयांचा अभ्यास केलेला असतो. खासगी, राजकीय, शासकीय कार्यालये, व्यावसायिक, खेळाडू, सेलेब्रेटी, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, सीए ऑफिस, इव्हेंट मॅनेजमेंट आदी ठिकाणी सहायक, स्वीय सहायक, जनसंपर्क अधिकारी, लेखनिक, स्पेशल ड्यूटी ऑफिसर, मीडिया असिस्टंट आदी पदांवर मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यांना अशा बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. ती थेट ‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून मिळू शकते. त्यामुळे ज्यांना काही कारणाने परीक्षेतून पद मिळवता आले नाही किंवा आता पर्यायी मार्ग निवडायचा आहे, अशा उमेदवारांना या संधीचा विचार करता येऊ शकतो, असे ऑफिस मॅनेजमेंट तज्ज्ञ चित्रसेन गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, अनेक वर्षांपासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, मात्र अनेकांना मनासारखी नोकरी, पद मिळाले नाही, म्हणून नैराश्यात जातात. जसे परीक्षा कशी द्यावी, याचे मार्गदर्शन दिले जाते. त्याप्रमाणे अपयश आले तर ‘बी’ प्लॅन तयार ठेवा, असे सांगितले जाते, मात्र नेमके काय करावे, हे सांगितले जात नाही. त्यामुळे त्या उमेदवाराला काय करावे, हे सुचत नाही. अशा उमेदवारांची मार्केटमध्ये खरी गरज आहे. फक्त उमेदवारांनी त्यात भर म्हणून जर काही आवश्यक कौशल्ये आत्मसात केली तर ४० ते ५० हजार रुपयांची नोकरी सहज मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, इमर्जन्सी लँडिंग

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT