पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देणार मराठी संवर्धनाला चालना

CD

पुणे, ता. २३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. तसेच विद्यापीठातील स्वतंत्र मराठी भाषा भवनाच्या स्थापनेला गती द्यावी, या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव किरण साळी यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना बुधवारी दिले. या मागण्यांवर निर्णय घेऊन मराठी संवर्धनाला चालना देण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे.
सर्व संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने आपले नाम फलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील, त्याबाबत चोवीस तासांत पत्रक काढण्यात येईल. मराठी भाषेला चालना देण्यासाठी स्वतंत्र मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी लवकर संबंधितांची बैठक घेण्यात येईल. तसेच मराठी भाषेचे संवर्धन करण्यात येईल, अशी ग्वाही ही कुलगुरूंनी दिल्याची माहिती किरण साळी यांनी दिली आहे. या वेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ कक्षाचे आकाश शिंदे, रोहीत कुचेकर, युवती सेनेचे मनिषा धारणे, तृप्ती ढगे, दीपाली घाडगे, युवासेना पदाधिकारी तुफान उंडे, गौरव पापळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT