पुणे

पोलिस आयुक्ताच्या टेलिग्रामवर पाठविल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रिका लोगो ः आरोग्य भरती गैरव्यवहार

CD

पुणे, ता. ४ : आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने, त्याच्या मोबाईलमध्ये पोलिस आयुक्त नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर टेलिग्राम अ‍ॅपद्वारे १२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रिका पाठविल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

आनंद भारत डोंगरे (वय २७, रा. फुरसुंगी, मूळ रा. सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १९ जणांना अटक झाली आहे. डोंगरे याला ३१ डिसेंबर रोजी अटक झाली होती. त्याला न्यायालयाने चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. डोंगरे याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी (ता. ४) न्यायालयात हजर केले होते. या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेला नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी प्रकाश मिसाळ याला एका मोबार्इल क्रमांकावरून संपर्क साधला होता. तो क्रमांक डोंगरे याच्या मोबाईलमध्ये सर्च केल्यावर, तो पोलिस कमिशनर या नावाने सेव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत विचारणा केल्यावर त्याची उत्तरे देण्यास तो टाळाटाळ करत आहे. आरोपीचा मोबाईल रिओपन पंचनाम्यामध्ये सहआरोपींचा मोबाईलक्रमांक वेगवेगळ्या नावाने सेव्ह केल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्याने यास्वरुपाचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने तसेच, संबंधित क्रमांक नेमका कोणाचा आहे, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे डोंगरे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: २ महिन्यांत सत्तेचा मोठा उलटफेर? उपमुख्यमंत्री थेट मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी, पडद्यामागे काय सुरू आहे?

Latest Marathi News Live Update: मेस्सी आणि सुनील छेत्री वानखेडेवर भेटले

'लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली ऊसतोडणी'; यंदा २५ ऊस हार्वेस्टरला साहाय्य, शेतकऱ्यांशी साधला संवाद

Solapur News: सोलापुरात दुहेरी उत्सव! महापालिका निवडणूक व सिद्धेश्वर यात्रा एकत्र साजरी होणार

Prakash Parab Passes Away: 'सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांचे निधन'; शिक्षण क्षेत्रातून हाेतेय हळहळ व्यक्त..

SCROLL FOR NEXT