ST sakal
पुणे

लालपरी येतेय पूर्वपदावर; सात दिवसांत ३४० कर्मचारी हजर

संपातील एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. मागील सात दिवसांत ३४० कर्मचारी कामावर आल्याने बसच्या संख्येतही वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

संपातील एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. मागील सात दिवसांत ३४० कर्मचारी कामावर आल्याने बसच्या संख्येतही वाढ होत आहे.

पुणे - संपातील (Strike) एसटी कर्मचारी (ST Employee) पुन्हा कामावर परतत आहेत. मागील सात दिवसांत ३४० कर्मचारी कामावर आल्याने बसच्या (Bus) संख्येतही वाढ होत आहे. पुणे विभागाच्या (Pune Department) दररोज ३७० बस वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. बसची संख्या वाढल्याने प्रवासी संख्या, एसटीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याच्या मार्गावर आहे. कर्मचाऱ्यांचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या शेवटच्या अल्टीमेटमनंतर कर्मचारी पुन्हा कामावर येत आहेत. मागील सात दिवसांत पुणे विभागात जवळपास ३४० कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे बसच्या संख्येत वाढ झाली. आता पुणे विभागात ३७० बस धावत आहेत.

सद्य:स्थिती

  • बसची संख्या : ३७०

  • रोजचा प्रवास : दीड लाख किलोमीटर

  • उत्पन्न : ७५ लाख रुपये

  • कामावर हजर कर्मचारी : १९००

  • प्रवासी संख्या : ६५ हजार

सात दिवसांत कामावर

हजर झालेले कर्मचारी

  • चालक : १६६

  • वाहक : १३५

  • चालक कम वाहक : १२

  • यांत्रिक : २५

  • प्रशासकीय : २

कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने बसच्या संख्येत वाढ होत आहे. २२ एप्रिलपर्यंत आणखी वाढ होईल.

- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT