पुणे

पाच वेळा भोंगे, तर पाच वेळा हनुमान चालिसा! राज ठाकरे यांचा इशारा ः जशास तसे उत्तर देण्याची तयारी

CD

पुणे, ता. १७ : ‘‘भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मला राज्यातील शांतता बिघडावयाची नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, सांगून देखील तुम्ही ऐकणार नसला आणि दिवसभरात पाच वेळा भोंगा लावणार असाल, तर मशिदीसमोर आम्ही देखील पाच वेळा हनुमान चालिसा लावू,’’ अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

भोंगाच्या विषयावरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्ष हा विषय तसाच राहिला आहे. कोणी काही लिहिले नाही, म्हणून मला वाटले त्यावर बोलले पाहिजे. याचा त्रास फक्त हिंदूंनाच होतो आहे, असे नाही. तर मुस्लिम समाजाला देखील होत आहे. देशभरातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमझान सुरु आहे. मला काही करावयाचे नाही. परंतु, तीन तारखेपर्यंत त्यांना समजले नाही आणि सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा त्यांना धर्म मोठा वाटत असले, तर जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. मनसेच्यावतीने त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे.’’

औरंगाबादला सभा; पाच जूनला अयोध्येत
शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर ‘मी आता लवंड्यांवर फार बोलत नाही,’ असे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे मी जाहीर सभा घेणार असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘येत्या पाच जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह औयोध्याला जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT