पुणे

पाटील यांची पत्नी, भावाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

CD

पुणे, ता. ३० : बीटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांची पत्नी आणि भावाचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिस कोठडीत चौकशी न करता गुन्ह्याचा तपास पूर्ण होवू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
पाटील यांची पत्नी कांचन रवींद्रनाथ पाटील आणि भाऊ अमरनाथ प्रभाकर पाटील यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी फेटाळला. बिटकॉईन या आभासी चलनाच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेले सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली होती. तर पाटील यांच्या पत्नी व भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दोघांनी न्यायालयात धाव घेतली होती. अर्जास सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी विरोध केला.
पाटील यांच्यावतीने ॲड. रोहन नहार यांनी कामकाज पाहिले. पाटील यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ नुसारचा गुन्हा लागू होत नाही. कारण ते ना सरकारी कर्मचारी नाही ना बँक कर्मचारी. आयटी ॲक्टनुसार दाखल असलेले कलमे हे जामीनपात्र आहेत, असा युक्तिवाद ॲड. नहार यांनी केला. न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी (ता. ३१) निकाल होणार आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT