पुणे

शैक्षणिक भूखंडाचा लिलाव

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० : शैक्षणिक कारणांसाठी हद्दीत राखीव असलेल्या सुमारे १७ भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यानुसार इच्छुक संस्था आणि व्यक्तींकडून निविदा मागविल्या आहेत. हे भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १७ गावांमधील हे भूखंड आहेत. अमेनिटी स्पेसच्या माध्यमातून या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांना उद्यापासून एक महिन्यांच्या आत ऑनलाइन पद्धतीने या लिलावात भाग घेता येणार आहे. प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयांसाठी हे भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

ॲमेनिटी स्पेसच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. या निर्णयामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पीएमआरडीएकडून यापूर्वी ही भूखंडाचे लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता मात्र विशिष्ट क्षेत्रासाठी राखीव असलेल्या भूखंड लिलावाद्वारे भाडेपट्टाने देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक भूखंडाचा भाडेपट्टाही पीएमआरडीएकडून निश्‍चित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT