पुणे

पुण्यात दुसरा डोस ९४ टक्के पूर्ण

CD

पुणे, ता. ३० ः कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसचा टप्पाही ९४ टक्के पूर्ण झाला असल्याने आता महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या कमी केली आहे. कोरोना लस घेण्यासाठी केंद्रांवर मिळणारा प्रतिसाद सातत्याने कमी असल्याने हा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
पुणे शहरात जानेवारीमध्ये कोरोनाचा ऑमिक्रॉन हा नवीन व्हेरियंटचा उद्रेक झाला होता. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली होती. पण, आता बहुतांश पुणेकरांनी लस घेतली आहे. त्यातून केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांसाठी संख्या कमी झाली आहे. त्या वेळी लसीकरणाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने १७९ केंद्रांवर लशीची व्यवस्था केली होती. केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे यापुढे केंद्रांची संख्या ६९ पर्यंत कमी करण्यात आली आहे. या ६९ केंद्रांपैकी ३० केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्‍स ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय सर्वच ६९ केंद्रांमध्ये कोवॅक्‍सीन आणि कोविशील्ड लस देण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे शहरात मोठ्या संख्येने लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे केंद्रांवरील गर्दी कमी होत आहे. केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिक नसतील तर, फोडलेल्या लशीतील उर्वरित डोस या जात आहेत. लहान मुलांसाठी देणाऱ्या येणाऱ्या कोर्बेव्हॅक्‍स च्या एका व्हायलमध्ये २० डोस आहेत. त्यामुळे या केंद्रांची संख्या कमी करून ३० करण्यात आली आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकार, महापालिका पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

IND A vs AUS A: एका कॅचसाठी भारताच्या दोन खेळाडूंची टक्कर... पुढे जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही, Video Viral

'आता दे ग दे जुजबी गालावर' सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाली... Video Viral

Marathi News Live Updates: कास पठाराला दुष्काळाच्या झळा; कमी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे फुलांचा बहर ओसरला, पर्यटकांमध्ये नाराजी

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

SCROLL FOR NEXT