पुणे

डेक्कन परिसरात ‘मान्यवरांची मांदियाळी’! अनिल दांडेकर यांचा अभिनव उपक्रम; दोन भारतरत्न, तीन पद्मविभूषण तर १० पद्मश्री यांचे वास्तव्य

CD

पुणे, ता. १ : पुणे हे विद्येचे माहेरघर समजले जाते व डेक्कन परिसरातील प्रभात, भांडारकर, कर्वे रस्ता भागांत मान्यवरांची मांदियाळी असल्याचे मानले जाते. येथे दोन भारतरत्न, तीन पद्मविभूषण आणि १० पद्मश्री सन्मान मिळविलेल्या दिग्गजांचे वास्तव्य आहे. या शिवाय जगभरात नावाजलेल्या संस्थाही याच भागात कार्यरत आहेत. ही माहिती अनिल दांडेकर यांनी संकलित केली असून, या संदर्भात त्यांनी ‘डायमंडस् ऑफ डेक्कन जिमखाना’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

‘‘मी भांडारकर रस्ता परिसरात १९५० पासून राहात आहे. येथील अनेक गोष्टी इतिहासजमा होत असल्याचे लक्षात आले व मन विषण्ण झाले. मुळात संशोधक वृत्ती असल्याने वेगळे काहीतरी करायचा ध्यास लागला. त्यातूनच या पुस्तकाची संकल्पना मनात आली. डेक्कन परिसरातील प्रभात, भांडारकर, आघारकर, घोले, सेनापती बापट रस्ता आणि मॉडेल कॉलनी, चतुःश्रृंगी परिसरात अनेक दिग्गज व्यक्ती राहत असल्याचे माहीत होते. नवीन पिढीला त्याची फारशी कल्पना नाही. या परिसरात जगभरातील नावाजलेल्या संस्थाही कार्यरत आहेत. त्यांची माहितीही संकलित केली. पुण्याच्या अन्य भागांतही दिग्गजांचे वास्तव्य आहे. या लिखाणातून पुण्याचा सांस्कृतिक खजिना शोधून लिखाणाला प्रेरणा मिळावी हा लेखनाचा हेतू आहे,’’ असे दांडेकर यांनी पुस्तकाच्या निर्मितीबद्दल बोलताना स्पष्ट केले.

पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २) सायंकाळी ४.३० वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या फिरोदिया ऑडिटोरिअम येथे राजहंस प्रकाशनचे मुख्य संपादक डॉ. सदानंद बोरसे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, स्वानंद प्रकाशनचे संजय भंडारे, ‘सकाळ’चे सहसंपादक निरंजन आगाशे उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. मंदार परांजपे प्रकट मुलाखत घेणार आहेत.

पुस्तकाची वैशिष्ट्ये
- डेक्कन जिमखाना परिसरातील जागतिक कीर्तीच्या १०१ व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती
- दोन भारतरत्न, तीन पद्मविभूषण, १० पद्मश्री सन्मानप्राप्त व्यक्ती
- वाङ्मय, कला, विज्ञान, क्रीडा, सामाजिक, लष्कर आदी २५ क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा परिचय
- जागतिक दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांची माहिती

अनिल दांडेकर - ५३५१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT