पुणे

सीएनजी सहा रुपयांनी स्वस्त

CD

पुणे, ता. १ : राज्य सरकारने सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याच्या दरात प्रतिकिलो ६.३० रुपयांची घट झाली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आता सीएनजी प्रतिकिलो ६२.२० रुपयांना मिळणार आहे. परिणामी सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजीवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरून तीन टक्के इतका कमी करण्याचे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले होते. त्यांची अंमलबजावणी गेल्या १ एप्रिलपासून सुरु झाल्याने सीएनजीचे दर कमी झाले आहेत.

एक दिवस आधी झाली दरवाढ
गुरुवारी (ता.३१) सीएनजी इंधन प्रतिकिलो अडीच रुपयांनी महागले होते. त्यामुळे ते ६८.५० रुपये प्रतिकिलो झाले होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी दर ६.३० रुपयांनी कमी झाले. दर कमी होणार म्हणून ही वाढ केली होती, अशी नाराजी वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. दरवाढ झाली नसती, तर सीएनजी आणखी स्वस्त झाले असते, असे सीएनजी वाहनचालक नीलेश पोकळे यांनी सांगितले.

सीएनजी तयार करण्यासाठी स्थानिक आणि आयात केलेले दोन प्रकारचे गॅस वापरण्यात येतात. आयात केलेल्या गॅसची किंमत गेल्या काही दिवसांत वाढली आहे. तर स्थानिक गॅसची देखील कमतरता आहे. त्यामुळे येत्या काळात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
-दीपक सावंत, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT