पुणे

प्रवासाविषयी माहिती देतोय ‘बिरबल’! मध्य रेल्वेच्या १० गाड्यांमध्ये सुविधा

CD

पुणे, ता २० : रेल्वे प्रवास अधिक मनोरंजक आणि माहितीपूर्ण होण्यासाठी आता रेल्वेतच तुम्हाला ‘बिरबल’ भेटणार आहे. हा ‘बिरबल’ तुम्हाला प्रवासात आढळणाऱ्या महत्त्वाच्या स्थळांची माहिती, वैशिष्ट्ये या शिवाय रेल्वे प्रवासात महत्त्वाचे ठरणारे क्रमांक सांगणार आहे. तसेच प्रवासात कंटाळा आला, तर तुमच्या सोबत गेमदेखील खेळणार आहे. ही सुविधा पुण्याहून सुटणाऱ्या केवळ दोन रेल्वेत सुरू करण्यात आली असून, यामध्ये डेक्कन क्वीन व इंद्रायणी एक्स्प्रेसचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास माहितीपूर्वक व मनोरंजनात्मक व्हावा याकरिता १० निवडक रेल्वेत ‘कन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह’ ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा वेगळा अनुभव मिळणार आहे.

कशी मिळवाल ही सुविधा
डब्यांत ‘ट्रॅव्हल विथ बिरबल’चे पोस्टर लावले आहेत. त्यावर क्यूआर कोड दिला आहे. तो मोबाईलवर स्कॅन केल्यांनतर मोबाईल चॅट बॉक्स खुला होईल. त्यावर विविध विंडो खुल्या होतील. त्यात आपल्याला हव्या असणाऱ्या विंडोवर जाऊन आपण विविध माहिती मोफत घेऊ शकतो.

कसा असेल ‘बिरबल’चा प्रवास
यामध्ये प्रवाशांना मोबाईलवरच रेल्वे ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरच्या शहराची माहिती, तेथील प्रसिद्ध स्थळे, मंदिरांची माहिती असणार आहे. शिवाय रेल्वे प्रवासात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कुठे मदत मागायची या बाबतची माहिती असेल. तसेच मुलांना कंटाळा आला तर विविध गेमदेखील आहेत.

या आहेत १० रेल्वे
मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, कुर्ला-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, कुर्ला-लखनऊ एक्स्प्रेस, कुर्ला-गोरखपूर एक्स्प्रेस व्हाया वाराणसी, कुर्ला-गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस व्हाया कानपूर, कुर्ला-शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, कुर्ला-गोरखपूर एक्स्प्रेस

प्रायोगिक तत्त्वावर १० रेल्वेत ही सुविधा दिली आहे. याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अन्य रेल्वेतदेखील ही सुविधा सुरू केली जाईल.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT