पुणे

राज्याची सीईटी परीक्षा लांबणीवर

CD

पुणे, ता. २१ ः व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलली आहे. राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
राज्यातील सीईटी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जून महिन्यात ११ ते २८ तारखेच्या दरम्यान होणार होत्या. मात्र, आता त्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होतील. परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी म्हटले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी होणारी जॉइंट एन्टरन्स एक्झाम अर्थात जेईई आणि वैद्यकीय प्रवेशासाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट म्हणजेच नीट (NEET) जून व जुलै महिन्यात होणार आहेत. जेईई मेनचे पहिले सत्र २९ जून तर, दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे. तसेच, नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गोंधळ टाळण्यासाठी सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सीईटी परीक्षेसाठी सध्या नोंदणी सुरू आहे. mhtcet2022.mahacet.org किंवा cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना सीईटीसाठी नोंदणी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

SCROLL FOR NEXT