पुणे

व्यसनमुक्ती केंद्रात ज्येष्ठाचा खून

CD

पुणे, ता. २१ ः सतत शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तरुणाने तेथील ज्येष्ठ नागरिकावर वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली.
अरुण मोहन राठी (वय ६४, रा. अनुबंध सोसायटी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संकेत सुनील आल्हाट (वय २४, रा. स्वामी नारायण मंदिरामागे, नऱ्हे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नांदेड सिटी येथील ५३ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे नऱ्हे येथील अभिनव महाविद्यालय रस्त्यावरील नेचरनेस बिल्डींग येथील सदनिकेमध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे. त्यामध्ये राठी व संकेत हे दोघेही दाखल होते. १६ एप्रिल रोजी संकेतचा वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाला त्याच्या कुटुंबातील कोणीही त्याला भेटण्यासाठी आले नाही. त्यामुळे तो तणावामध्ये होता. दरम्यान, राठी हे संकेतला सतत शिवीगाळ करीत असे. त्याचा राग मनात ठेवून संकेतने गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास राठी हे झोपले असताना त्यांच्यावर आरशाच्या काचेच्या तुकड्याने गळ्यावर वार केले. या घटनेत राठी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT