Sakal Digital
पुणे

मसाजच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय; दोघांना अटक, तीन तरुणींची सुटका

CD

पुणे, ता. २१ : आलिशान स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेला वेश्‍याव्यवसायावर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून परराज्यातील तीन तरुणींची सुटका केली आहे.
व्यवस्थापक सुफीयान अहमद अली (वय २२, रा. विमाननगर, मुळ रा. आसाम) व त्याचा साथीदार व्यवस्थापक अब्दुल मलिक मुफूर अली (वय २१, रा. येरवडा, मुळ रा. आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर स्पाचा मालक, भागीदार महंमद अब्दुल हचिब (वय २५, रा. आसाम), अन्वर दाऊदभाई अहमदाबादी (वय ६८, रा. विमाननगर) व शबनम सुलेमान शेख (वय ३२, रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
विमाननगर येथील सिंबायोसिस रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये "मेरियन स्पा'' हे मसाज पार्लर सुरू होते. येथे वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे बनावट ग्राहक पाठविले. संबंधित प्रकाराची खात्री होताच पोलिस पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी तेथे आसाम येथील एका तरुणीसह इतर तीन तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले.
त्यानुसार, पोलिसांनी तेथील दोन व्यवस्थापकांना अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: वाकोला नाल्यावर जलवाहिनीसाठी पूल, महापालिकेचा तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार

IPL 2026: श्रेयस अय्यरकडून 'गिफ्ट' साठी, प्रियांश आर्य व कूपर कॉनली यांनी LSG च्या गोलंदाजांना दिला चोप; काय होती अट?

IPL 2026 : सीधी बात नो बकवास! "MS Dhoni च्या फॅन्सने चापलूसी करणे सोडावे, तो आला तरी CSK च्या कामगिरीत फार फरक पडणार नाही"

हार्दिक, तू शेवटची मॅच विनिंग खेळी केव्हा केली होतीस? Mumbai Indians च्या कर्णधारावर शब्दांचा मारा; MI vs GT सामन्यापूर्वी सल्ला

लाल साडी, पारंपरिक सोन्याचे दागिने अन् साधा मेकअप; मुकेश अंबानींच्या 66व्या वाढदिवशी नीता अंबानी दिसल्या रॉयल अंदाजात, Viral Video

SCROLL FOR NEXT