पुणे

आरटीओच्या हेल्मेट प्रबोधन मोहिमेला प्रारंभ

CD

पुणे, ता. ७ : शहरात सध्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट परिधान करण्याबाबत प्रबोधन मोहीम प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या तर्फे राबविली जात आहे. या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांना सहभागी करत हेल्मेट परिधान करण्याबाबत पहिल्या टप्प्यात प्रबोधन करावे. असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार या मोहिमेला सुरुवात करण्यात आल्याचे आरटीओ विभागाने सांगितले. त्याअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, एसएससी बोर्ड या विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी हेल्मेट परिधान करण्याबाबत प्रबोधन केले.
या मोहिमेसाठी आरटीओने २० अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांचे चार गट तयार केले आहेत. एका गटात एक मोटार वाहन अधिकारी आणि चार सहायक मोटार अधिकारी अशा पाच जणांचा समावेश आहे. या गटाच्या माध्यमातून विविध शासकीय, कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जीएसटी, सेंट्रल इमारत, शिमला ऑफिस आदी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.


जिल्ह्याधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आरटीओकडून हेल्मेट परिधान करण्याबाबत प्रबोधन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार आरटीओची टीम कार्यरत आहे. कर्मचारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. नियमित हेल्मेट परिधान करतील हा विश्वास आहे.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग

असे असावे हेल्मेट
- हेल्मेटवर आयएसआय मार्क असावे
- लॉकिंग क्लिप घट्ट लावलेली असावी
- हेल्मेटच्या मागील बाजूस रेडिअम पट्टी चिटकवावी
- हलका, चमकणारा रंग असावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Oil News: UAE ने OPEC ला दिला धक्का! 50 वर्षांनंतर बाहेर पडण्याचा निर्णय; जागतिक आणि भारतीय तेल बाजारावर काय होणार परिणाम?

UP Cheap Electronics: पंख्याच्या किमतीत कूलर आणि अर्ध्या दरात एसी! 'या' मार्केटमध्ये मिळते स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मेजवानी!

Latest Marathi News Live Update: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय थालपथीचे शिर्डीच्या साई मंदिरात आगमन

कच्चं तेल १११ डॉलरच्या वर, अनेक देशात इंधन दराचा भडका; हाँगकाँगमध्ये पेट्रोल सर्वात महाग, ३९३ रुपये प्रति लीटर

मुंबइचा जलसम्राट आर्यनचा गोव्यात विश्वविक्रम; रात्रंदिवस सलग २१० किलोमीटर समुद्रात पोहून रचला इतिहास

SCROLL FOR NEXT