पुणे

जेईई परीक्षा दोन महिने पुढे ढकलली

CD

पुणे, ता. ७ : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्यासह नामांकित केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘जेईई मेन’ परीक्षा जवळपास दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रातील परीक्षा जूनमध्ये तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा जुलैमध्ये होणार आहे.
देशभरातील विविध राज्यात बारावीची परीक्षा घेणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच्या तुलनेत यंदा उशिराने होत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेचे पहिले सत्र २१ एप्रिल ते ४ मे या कालावधीत, तर दुसरे सत्र २४ ते २९ मे या कालावधीत होणार होते. आता सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या सत्रातील परीक्षा २० ते २९ जून दरम्यान होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षा २१ ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आता संपली आहे. तसेच दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल, असेही एनटीएने स्पष्ट केले आहे.

परीक्षेच्या अधिक माहितीसाठी
- www.nta.ac.in
- https://jeemain.nta.nic.in/

सुधारित वेळापत्रक
पहिले सत्र : २० ते २९ जून २०२२
दुसरे सत्र : २१ ते ३० जुलै २०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT