पुणे

मशिदीवरील भोंग्याचा वसंत मोरे बळी

CD

पुणे, ता. ७ : मशिदीवरील भोंगे काढण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकारण सुरू झाले असून, त्याचा पहिला बळी वसंत मोरे ठरले आहेत. भोंगे काढणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मोरे यांना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात आले. मनसेने त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर त्याला प्रत्युत्तर म्हणून स्पीकरवरून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले. माझ्या प्रभागात मुस्लीम मतदार आहेत, हा विषय माझ्यासाठी अडचणीचा ठरत असल्याने माझ्या भागात मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधात स्पीकर लावणार नाही, अशी भूमिका
मोरे यांनी घेतली. त्याच्या या भूमिकेमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी बाबर यांची शहराध्यक्षपदी निवड केली. त्याबाबत मोरे यांनाही कल्पना नव्हती. दरम्यान, मोरे यांनी "आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे" अशी फेसबुकवर पोस्ट टाकत बाबर यांचे अभिनंदन केले.

मला सर्व पक्षाकडून प्रवेशाची ऑफर येत आहेत, पण मी मनसे सोडून कोठेही जाणार नाही. गेल्या महिन्यातच मी राज ठाकरे यांना भेटून या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. साईनाथ बाबर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना संपूर्ण सहकार्य असेल.
- वसंत मोरे, माजी शहराध्यक्ष, मनसे

राज ठाकरे यांनी मला बोलावून शहराध्यक्ष पद सांभाळायचे आहे, असा आदेश दिला. तो मान्य करून ही जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन काम करणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीत यश मिळविणार आहे.
- साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे

राष्ट्रवादी काँग्रेसची मोरे यांना ऑफर
वसंत मोरे यांना मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली. मोरे यांचा पक्षात योग्य पद्धतीने सन्मान केला जाईल. तसेच राज ठाकरे यांचे विचार न पटणाऱ्या कार्यकर्त्यांचेही राष्ट्रवादीमध्ये स्वागत आहे, असे जगताप यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT