पुणे

टीईटी गैरव्यवहार; दोघांच्या कोठडीत वाढ

CD

पुणे, ता. ७ : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांच्या पोलिस कोठडीत नऊ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कलीम गुलशेर खान (वय ५२) आणि राजेंद्र विनायक सोळुंके (वय ५२) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने खान, सोळुंके यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, या प्रकरणी यापूर्वी अटक आरोपी स्वप्नील पाटील याच्याकडे ४० अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी त्यांची माहिती व पैसे राजेंद्र सोळंके याने दिले असल्याचे पाटील याने सांगितले आहे. हे विद्यार्थी कोण होते? याबाबत सोळुंके याच्याकडे तपास केला असता तो तपासात सहकार्य करत नाही. यापूर्वी अटक संतोष हरकळ याच्याकडील तपासात कलीम खानसह इतर पाच आरोपींनी ६५० अपात्र विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे पैसे हरकळ याला दिले आहेत. गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT