पुणे

कोकण, विदर्भात पावसाची शक्यता

CD

पुणे, ता. ७ : राज्यात तुरळक भागात पावसाच्या सरी तर काही ठिकाणी गारपीटांचा पाऊस होत आहे. अशात उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा कायम आहेत. सध्या उष्णतेची लाट काहीशी ओसरत असली तरी उन्हाचा कडाका कायम राहणार आहे. तर शुक्रवारी (ता. ८) मध्‍य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.९ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान महाबळेश्‍वर येथे १९.९ अंश सेल्सिअस नोंदले जात आहे. राज्यात कमाल तापमानासह किमान तापमानात ही वाढ होऊ लागली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा सुमारे ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे.

विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडत आहे. तसेच पुढील दोन दिवस कोकणात तर शुक्रवारी (ता. ८) कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. रविवारपासून (ता. १०) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मार्च ठरला सर्वाधिक उष्ण
यंदाच्या हंगामात मार्च महिना उष्ण ठरला आहे. १९०१ ते २०२२ ची स्थिती पाहता यंदा मार्च महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा १.८६ अंशांनी जास्त नोंदला गेला. त्यामुळे मार्च महिना देशासाठी ‘ताप’दायक होता. दरम्यान आता एप्रिल महिन्यात ही सध्या तापमानात वाढ पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Solapur News : माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT