पुणे

‘प्रभातकालीन मैफिलीतून नावीन्यपूर्ण अनुभव’

CD

पुणे, ता. ८ ः ‘‘गायन-वादनाच्या मैफली बहुतांश सायंकाळीच होतात. त्यामुळे ठराविक रागांचे सादरीकरण होत असते. परंतु प्रभातकालीन रागांच्या सुरावटी या आध्यात्मिक आणि भक्तिपूर्ण वातावरणाची निर्मिती करणाऱ्या आणि नवीन अनुभव देणाऱ्या असतात. श्रोता रसिक असेल तर त्यालाही अशा प्रभातकालीन मैफलीतून काहीतरी नवीन गवसते’’, असे मत संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी व्यक्त केले.
‘प्रभातस्वर’ ही प्रभातकालीन रागांची मैफल उद्या (ता. १०) सकाळी ६.३० वाजता डेक्कन जिमखान्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारातील ज्ञानवृक्षाखालील मोकळ्या जागेत होणार आहे. या मैफलीनिमित्त त्यांनी संवाद साधला. ‘‘बऱ्याच कालखंडानंतर पुण्यात सादरीकरणाची संधी मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात मैफल आयोजित केली असल्याने मीही सादरीकरणास उत्सुक आहे. पुण्यातील रसिक चोखंदळ आहेत, मोठ्या संख्येने कार्यक्रमांना हजेरी लावतात त्यामुळे चांगला माहोल तयार होतो’’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : गोकुळ निवडणुकीवर सतेज पाटील पहिल्यांदा बोलले, म्हणाले, ''पराभूत उमेदवारांनी...''

Pune News : गणेशखिंड रस्त्याच्या कामावरून पीएमआरडीएवर नाराजी

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

SCROLL FOR NEXT