पुणे

आकाशाशी जडवू नाते !

CD

आकाशाशी जडवू नाते !
दोन दिवसीय निवासी आकाशनिरीक्षण शिबिराचे आयोजन

पुणे, ता. ९ ः अथांग विश्वाचे सर्वांनाच कुतूहल असते. तारे, ग्रह, आकाशगंगा, उल्कावर्षाव, धूमकेतू हे शब्द ऐकूनच मुलांची उत्सुकता जागृत होते. विद्यार्थ्यांना शालेय वयातच खगोलशास्त्राची, आकाश निरीक्षणाची गोडी लागावी व त्याचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू करावा या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांच्या वतीने येत्या २४ ते २६ डिसेंबरदरम्यान २ रात्र व १ दिवस निवासी आकाशनिरीक्षण शिबिराचे आयोजन अहमदनगरजवळ एफर्ट्स तारांगण येथे करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संडे सायन्स स्कूल अशा शिबिरांचे आयोजन विविध ठिकाणी करत आहे.
या शिबिरादरम्यान एकूण २ रात्री विद्यार्थी आकाशातील तारे, ग्रह, नक्षत्र-राशी, ध्रुव तारा शोधणे, राशी समूह ओळखणे या पद्धतीने आकाशाची ओळख करून घेतील. याच वेळी उच्च क्षमता असणाऱ्या दुर्बिणीतून देवयानी आकाशगंगा, विविध तारकासमूह, चंद्र, मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी या ग्रहांचे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दुर्बिणी प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ८ इंच व १४ इंच कम्पुटराइज्ड दुर्बीण, २० इंच डोबसोनियन दुर्बीण, सोलर दुर्बीण आदी उपकरणांचा उपयोग यासाठी करण्यात येणार आहे. दिवसा विद्यार्थी सूर्याचे निरीक्षण करतील, खगोलशास्त्र हा विषय समजून घेतील तसेच येथे असलेल्या तारांगणामध्ये ‘‘इन्वेडर्स ऑफ मार्स’’ हा शो त्यांना दाखविला जाणार आहे. वय वर्ष १० व त्यापुढील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात. मुला-मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असून, शिबिरात मराठी-हिंदी-इंग्रजी भाषांमध्ये संवाद केला जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

शिबिराविषयी
केव्हा : २४ ते २६ डिसेंबर
शुल्क : प्रवास, नाश्ता-जेवण, निवास, प्रशिक्षणासहित रु. ३२००/-
प्रवेशासाठी संपर्क : 9850047933/9373035369/8779678709


PNE21S26453

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT