पुणे

लक्ष्मी रस्त्यावर शनिवारी (ता.11) "वॉकींग प्लाझा'', वाहतुकीत बदल

CD

‘‘शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौकादरम्यानच्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.’’
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

बंद असणारे रस्ते व पर्यायी मार्ग ः
- लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी बाजीराव रस्त्याने पुढे सरळ अप्पा बळवंत चौकातून केळकर रस्त्याने टिळक चौकाकडे, तसेच अप्पा बळवंत चौकातून सरळ पुढे गाडगीळ पुतळा (शनिवारवाडा) मार्गे इच्छितस्थळी जावे
- केळकर रोडवरील मंदार लॉजकडून लोखंडे तालीम चौक मार्गे पुढे लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकाकडे जाणारी वाहने ही केळकर रस्त्यावरून, पुढे रमणबाग चौक (टकले हवेली चौक) मार्गे उंबऱ्या गणपती चौकाकडून इच्छितस्थळी जावे
- लक्ष्मीरोड बेलबाग चौकाकडून सेवासदन चौकाकडे येणारी वाहने बाजीराव रस्त्याने पुढे अप्पा बळवंत चौकातून पुढे जातील.
- बाजीराव रोड पूरम चौकातून शनिपार चौक मार्गे लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौकाकडे जाणारी वाहने सरळ बाजीराव रस्त्याने अप्पा बळवंत चौकमार्गे पुढे जातील.
- आवश्‍यकतेनुसार पूरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, टिळक चौक मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जावे
- आवश्‍यकतेनुसार स. गो. बर्वे चौकाकडून शिवाजी रोडकडे येणारी वाहने ही जंगली महाराज रस्त्याने पुढे जावे
- लक्ष्मी रोडवरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंत असलेली दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT