दहावीच्या विद्यार्थ्याची
गळफास घेत आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याने निकालाच्या काही तास अगोदरच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. सोहम ज्ञानेश्वर मोरे (वय १५, रा. वडोद खुलताबाद, सध्या रा. पुंडलिकनगर) असे मृताचे नाव आहे. निकालात तो ४२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला होता. मात्र, निकाल पाहण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
सोहमने दहावीची परीक्षा दिली होती. शुक्रवारी सकाळी त्याने त्याच्या आईला कामावर सोडले. यानंतर तो घरी आला. मोठा भाऊ ओम हा गावाकडे, तर वडील बाहेरगावी असल्याने घरी कुणीच नव्हते. यावेळी त्याने दोरीच्या साह्याने गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार शेजाऱ्याने पाहिला. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. सोहमचे वडील हे एसटी वर्कशाॅपच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.