पुणे

निदा खानवरून राजकारण तापले

CD

छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून अटक केली. आता यावरून एमआयएम विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. ‘खानला एमआयएमने सहकार्य केले. कॉर्पोरेट जिहादप्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीतून एक मोठे षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल’, असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला; तर ‘निदा खान निर्दोष असेल तर तिच्या पाठीशी उभे राहू. मात्र, तिची चूक आढळल्यास कोणतीही मदत करणार नाही’, असे इम्तियाज म्हणाले.
मंत्री शिरसाट यांनी थेट एमआयएम आणि इम्तियाज यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार एमआयएमच्या महाशयांच्या नेतृत्वात होतात. खान ही केवळ एक मोहरा आहे. त्यांचे जाळे महाराष्ट्रभर आहे. खान इतर कुठेही न जाता केवळ संभाजीनगरलाच का आली? ती संभाजीनगरमध्ये अशा परिसरात लपली होती, त्या परिसरात मोठी झोपडपट्टी आहे; तिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात. शिवाय खान एकटी नव्हती तर तिची आई आणि मावशी सोबत होती. त्यामुळे इम्तियाज यांचीही चौकशी झाली पाहिजे’’, असेही ते म्हणाले.
--
पोलिसांना पूर्ण सहकार्य करू : इम्तियाज
इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले, की या प्रकरणात पोलिसांनी मला विचारणा केली तर मी पूर्ण सहकार्य करेन. एफआयआर दाखल झाला आहे म्हणजे पोलिसांकडे काही माहिती असेल. नियमाप्रमाणे तपास होईल. निदा खान निर्दोष असेल तर तिच्या पाठीशी राहू. मात्र, तिची चूक आढळल्यास कोणतीही मदत करणार नाही. आमच्या नगरसेवकाचा यात नेमका काय रोल आहे, हे आम्हीही जाणून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT