पुणे

यूजीसी-नेट परीक्षेसाठी एकाच अर्जाचा नियम

CD

यूजीसी-नेट परीक्षेसाठी
केवळ एकच अर्ज ग्राह्य
विषय निवडताना काळजी घ्या; एनटीएच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) जून २०२६ मधील राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेसाठी एका उमेदवाराने केवळ एकच अर्ज सादर करावा, एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास केवळ शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्था जून २०२६ मधील राष्ट्रीय पात्रता परीक्षा ८७ विषयांसाठी संगणकाधारित पद्धतीने घेणार आहे. एका उमेदवाराने एकाच विषयासाठी किंवा वेगवेगळ्या विषयांसाठी अनेक अर्ज सादर केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत केवळ शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि इतर सर्व अर्ज रद्द करण्यात येतील. उमेदवारांनी अर्ज भरताना विषयाची निवड काळजीपूर्वक करावी, कारण अर्ज सादर केल्यानंतर विषय बदलण्याची संधी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जातील सर्व माहिती अचूक आणि पूर्ण असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करण्याचे आवाहन परीक्षा संचालक कर्नल बी. विजयकुमार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात! सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला; सुळेंसह सर्वजण सुरक्षित

Beed Crime: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या घराची झाडाझडती; २०१६ पासूनच्या फाईल्स उघडणार?

'चल, अजून एक विकेट टाकली खिशात...'! जोस बटलरला बाद करताच जाडेजाचा भन्नाट सेलिब्रेशन; ‘इन माय पॉकेट’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा

RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

SCROLL FOR NEXT