पुणे

भूसंपादन घोटाळा : बीडमधील ''त्या'' नामांकित सहकारी बँकेवर कारवाईची टांगती तलवार; महसूलची एसआयटी करणार चौकशी

CD

गैरव्यवहार करणाऱ्यांना
बीडच्या बँकेचेही सहकार्य?


मावेजा प्रकरणी नियम उल्लंघून खात्यांवर व्यवहारांचा संशय



बीड, ता.१० : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजाच्या २४१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अटकेनंतर आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. या गैरव्यवहारातील पैशांच्या विल्हेवाटीसाठी नियम धाब्यावर बसवून बीडच्या ‘एका’ बँकेने ‘सहकार्य’ केल्याचा संशय आहे. त्यामुळे ही बँकही विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) ‘रडार’वर आली आहे.

महामार्ग भूसंपादन मावेजा गैरव्यवहारातील कोट्यवधी रुपये लाभार्थी, अधिकारी आणि दलालांमध्ये वाटप करण्यासाठी या बँकेचा वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) आता या बँकेच्या व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे. लाभार्थींचे खाते उघडताना बँकेने आवश्यक कागदपत्रांची (आधार, पॅन इ.) पूर्तता न करताच थेट कोट्यवधींचे व्यवहार होऊ दिले, अत्यंत संशयास्पदरीत्या एकाच दिवशी अनेक खाती उघडून त्यातून तातडीने रकमा उचल करण्यात आल्या, शासनाकडून आलेला मावेजा जमा होताच, त्याच दिवशी वकील, महसूल अधिकारी आणि दलालांचे हिस्से वाटप करण्यात या बँकेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. ​या सर्व बेकायदेशीर व्यवहारांमागे एका स्थानिक सल्लागार व्यापाऱ्याचे नाव चर्चेत आहे. हा सल्लागार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि त्याच्याच सांगण्यावरून बँकेने नियम मोडीत काढून व्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
------------------
पाठकच्या मुंबईतील घराची झडती
​बीड : मावेजा गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी बीड पोलिसांच्या विशेष तपास पथकाने रविवारी (ता. दहा) त्याच्या मुंबई येथील निवासस्थानी झाडाझडती सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT