पुणे

जळगाव : नार पार - गिरणा प्रकल्पाचा पडला विसर

CD

नार पार-गिरणा प्रकल्पाचा पडला विसर

मध्यंतरी राज्य सरकारने केली होती घोषणा

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या नार-पार-गिरणा प्रकल्पासंबंधी मध्यंतरी किंवा निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा प्रकल्प खानदेशात चर्चेत होता. त्यात राज्य शासनाने यंदा त्याबाबत घोषणा केली आहे. परंतु, त्याचे काम प्रत्यक्षात हाती घेतलेले नाही.

या प्रकल्पामुळे अवर्षणप्रवण गिरणा पट्ट्यातील टंचाई व शेती सिंचनासंबंधी पाण्याची अडचण कायमस्वरूपी दूर होईल. या प्रकल्पासाठी खानदेशातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास प्रकल्प लवकरच हाती घेतला जाईल, असा मुद्दाही चर्चिला जात आहे. यासह पाडळसे (ता.अमळनेर) या निम्न तापी प्रकल्पाचीही चर्चा आहे. हा प्रकल्पदेखील २५ ते २६ वर्षे अपूर्णच आहे.
अनेक वर्षे नार-पार-गिरणा प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी सर्वेक्षण व अन्य कार्यवाहीदेखील मध्यंतरी झाली होती. नार-पार खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी गिरणा पट्ट्याच आणण्याची ही योजना आहे. त्यासाठी ७,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नार-पार-गिरणा परियोजनेस शासनाने मंजुरी दिल्याने काम सुरू होईल, याची अपेक्षा आहे. परंतु, त्याचे काम गती केव्हा घेईल, हा मुद्दाही आहे. फैजपूर (ता.यावल, जि.जळगाव) येथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नार-पार-गिरणा प्रकल्पासंबंधीचे काम सुरू असल्याचे म्हटले होते.

--- चौकट ---
दुष्काळमुक्तीचा प्रयत्न करावा
नाशिक जिल्ह्यातील दमणगंगा, नार-पार, अंबिका या नद्यांचे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते. त्याचा उपयोग होत नाही. हे पाणी नद्यांची दिशा पूर्व वाहिनी करून ते गिरणा नदीत किंवा गिरणा पट्ट्यात आणावे. हे पाणी थेट गिरणा नदीवरील धरणांत येईल व बारमाही प्रकल्प भरलेले राहतील किंवा पाण्याची समस्या मिटेल. गिरणा पट्टा अवर्षणप्रवण आहे. त्यात नाशिकमधील मालेगाव, जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, पारोळा व अमळनेर या तालुक्यांना लाभ होईल. यामुळे या भागात पाण्याचे चांगले स्रोत असावेत, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण केंद्राने हा प्रकल्प रद्द केला. त्यात राज्याने घोषणा केली, पण अजून काम हाती घेतलेले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT