पुणे

अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यात २७८४ कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे १४ मे रोजी भूमिपूजन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

CD

फोटो ओळी ः नितीन गडकरी

२७८४ कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची अक्कलकोटमध्ये राहणार उपस्थिती

अक्कलकोट, ता. १२ ः सोलापूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभ गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजता अक्कलकोट येथील नवीन बसस्थानक परिसरात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
या कार्यक्रमात एकूण १७१ कि.मी. लांबीच्या आणि तब्बल २७८४ कोटी रुपये खर्चाच्या विविध महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यात हसापूर ते बडदाल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५०(सी) या मार्गाच्या ग्रीनफिल्ड अलाईनमेंट सहा पदरीकरणाचा १५५२ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समाविष्ट आहे. तसेच वागदरी–अक्कलकोट–तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८(बी)चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण, मोहोळ–बसवनगर– वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण, दुधनी येथील रेल्वे उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग १५० ई चे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण (प्रकल्प खर्च ९७ कोटी) तसेच राष्ट्रीय महामार्ग १५० ई वरील बोरी उमरगे येथील बोरी नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचा(प्रकल्प खर्च २६ कोटी) आदींचा समावेश या प्रकल्पांमध्ये आहे.
कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कर्नाटक राज्य धोरण व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, खा. डॉ. ज्योती वाघमारे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खा. धैर्यशील मोहितेपाटील, बिदरचे खा. सागर खंड्रे, खा. प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, कर्नाटकचे पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे, आ. विजय देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT