पुणे

कोल्हापूर: ठिबक बसवा; बारमाही पिके घेऊ नका!

CD

ठिबक बसवा; बारमाही पिके घेऊ नका

जलसंपदा विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन; पाणी साठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा जास्त पाणी लागणारी बारमाही पिके घेणे टाळावे. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन यंत्रणा बसवावी, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पाणी वापराबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील प्रमुख धरणे, जलाशये, तलाव आणि इतर जलसाठ्यांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्याचा प्राधान्यक्रमाने वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
जास्त पाणी लागणाऱ्या नवीन लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्याचे टाळावे. खरीप भुसार व कमी पाण्यात जास्त चारा देणारी पिके घ्यावीत. अनधिकृत पाणी उपसा करू नये. आढळल्यास मोटारी, पाइपलाइन व इतर साधने जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने चालवावीत. बागा, उद्याने, धुणे, इतर हरित क्षेत्रे आणि औद्योगिक कामांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा. पिण्यायोग्य पाण्याचा इतर कामांसाठी कमीत कमी वापर करावा. उद्योगांनी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करावा, तसेच पिण्यायोग्य पाण्याचा इतर कामांसाठी वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जलसाठ्यांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता राखणे, जनावरांसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करणे आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचे नियोजन करणे याला प्राधान्य दिले जाणार आहे.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करावा. याबाबत जलसंपदा विभागाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांनी पाणी वापराच्या सूचनांचे पालन करावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : हार्दिकचा पत्ता कट करायला, मुंबईचा २३ वर्षीय ऑल राऊंडर येतोय; न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघात निवडीची जोरदार चर्चा...

SPPU Campus Agitation Row : पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी! व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

Maharashtra Live News : जखमी तरुणासोबत राहुल गांधींची पत्रकार परिषद; "तरुणांच्या आवाजापुढे कोणीही टिकणार नाही"

Kolhapur Water Crisis : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य! धरणांमधील 10 टक्के पाणी राखून ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे महत्त्वाचे आदेश

WhatsApp चे नवीन धमाकेदार फीचर! आता 10 मिनिटांपासून 14 दिवसांपर्यंत आधीच शेड्यूल करा मेसेज, फोटो अन् व्हिडिओ...

SCROLL FOR NEXT