पुणे

पुणे-नाशिक मार्गावर ''महाकोंडी''

CD

आळेफाटा, ता. ९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा ते बोटा दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळे शनिवारी पहाटेपासून भीषण वाहतूक कोंडी झाली. शनिवार (ता. ९) , रविवार (ता. १०) सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढल्याने महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
महामार्गावर एका बाजूचे काम सुरू असल्याने वाहतूक केवळ एकाच लेनमधून सुरू आहे. शनिवारी (ता. ९) पहाटे पाचपासूनच वाहनांची संख्या वाढल्याने सकाळी सहापर्यंत संपूर्ण रस्ता ठप्प झाला. पुणे-मुंबईकडून नाशिक आणि शिर्डीकडे जाणाऱ्या पर्यटकांना उन्हाच्या तडाख्यात तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाणी व अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी म्हसवंडी-पिंपरी पेंढार या अंतर्गत मार्गांचा अवलंब केला. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे हे ग्रामीण मार्गही ठप्प झाले आहेत. प्रशासनाने किंवा ठेकेदाराने सुट्ट्यांच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या आळेफाटा आणि घारगाव पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

Valley Beauty : जिथे भारताची सुरुवात होते 'त्या' व्हॅलीत राहतो सर्वांत सुंदर समुदाय; तिथल्या देखण्या महिलांपुढे हिरोईनसुद्धा फेल

OMG: रोहित शर्मा पाकिस्तानचा कसोटी कॅप्टन, शुभमन गिल संघात? BAN vs PAK सामन्यात मोठी चूक, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा राडा

Paithan Water Crisis: धरण उशाला कोरड घशाला..! पैठण तालुक्यातील अठ्ठावीस हजार नागरिकांची तहान भागवण्यासाठी सोळा टँकर

SCROLL FOR NEXT