आळेफाटा, ता. १० : वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पादिरवाडीतील शेतकरी कन्या रचना भाऊसाहेब पादिर हिची मिरा-भाईंदर पोलिस दलात निवड झाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने संपूर्ण पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रचनाने तिचे प्राथमिक शिक्षण पादिरवाडी जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण रेऊबाई बाळाजी देवकर महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पोलिस होण्याचे ध्येय उराशी बाळगून तिने आळेफाटा येथील सह्याद्री करिअर ॲकडमीमध्ये मयुर डुंबरे व गीताराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम घेतले.
वडिल भाऊसाहेब पादिर हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या मुलीने पोलिस होऊन देशसेवा करावी, ही त्यांची इच्छा रचनाने जिद्दीच्या जोरावर पूर्ण केली. या यशात तिला आई चांगुणा आणि भाऊ ऋषिकेश यांचेही मोलाचे प्रोत्साहन लाभले. एका ग्रामीण भागातील मुलीने पोलिस दलात भरती होऊन समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे.
पोलिस बनवण्यासाठी मला कुटुंब, आळेफाटा येथील सह्याद्री ॲकॅडमी मधील शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यासाठी दररोज सकाळी ग्राऊंड, लेखीपुर्ण परीक्षेची तयारी केल्याने यश प्राप्त झाले आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन मोठे अधिकारी व्हायचे आहे.
- रचना पादीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.