पुणे

आसू : फलटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची तालुकास्तरीय समिती मार्फत पाहणी : सर्वच ग्रामपंचायतींच्या कामाचे कौतुक

CD

फलटणला तालुका समितीमार्फत पाहणी

वैभववाडी पंचायत समितीच्या शिष्टमंडळाची २६ ग्रामपंचायतींना भेट

आसू, ता. ८ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत फलटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतींनी केलेल्या प्रशासकीय कामकाजाचे नियोजन आणि राबविलेल्या विकासकामांबाबत समितीने समाधान व्यक्त केले.
वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष प्रिमेश रमेश वाघ आणि समिती सदस्य लघु पाटबंधारेचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी जवाहर नीलमवार, तालुका अभियान व्यवस्थापक सुशांत कदम, विस्तार अधिकारी (कृषी) कांता जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सचिन कल्लाप्पा कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किशोर सकपाळ आणि पत्रकार उज्ज्वल नारकर आदींचा या तालुकास्तरीय समितीत समावेश होता. त्यांनी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविलेल्या विकासकामांची पाहणी केली. फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले उपस्थित होते.
अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या अर्जांची निर्गती, तक्रारींचे निराकरण, पाणीपुरवठा, जलस्रोतांची बळकटी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शिक्षण, दिव्यांग योजना, ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी वसुली, लोकवर्गणीतून योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अंमलबजावणीसाठी गुणांकानुसार ग्रामपंचायत श्रेणी ठरविण्याचे काम तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील समित्यांमार्फत करण्याचे व त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्याचे नियोजन करण्यात आले.
फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींपैकी २० टक्के म्हणजे २६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यामध्ये विडणी, राजाळे, साखरवाडी, कोळकी, काळज, सुरवडी, जाधववाडी (फ), वाठार निंबाळकर, मिरगाव, गिरवी, निंबळक, कुरवली खुर्द, निरगुडी, तरडफ, ठाकूरकी, ढवळेवाडी (निंभोरे), बिबी, वाघोशी, सालपे, विठ्ठलवाडी, आळजापूर, वडले, नाईकबोमवाडी, माझेरी, वडगाव, धुमाळवाडी या गावांचा समावेश आहे.
---------------------------
02826
विठ्ठलवाडी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात दप्तरातील विविध नोंदणीची पडताळणी करताना समिती अध्यक्ष प्रिमेश वाघ, जवाहर नीलमवार, प्रकाशकुमार बोंबले आदी.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT