पुणे

आसू : फलटणला तापमानाचा पारा ४३ अंशांच्या उंबरठ्यावर पोचला

CD

फलटणला तापमान ४२ अंशावर

आसू, ता. ११ ः फलटण शहरासह तालुक्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र होत असून, आज तापमानाचा पारा ४३ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. काल कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस, तर किमान २८.३ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, या वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
शहरासह तालुक्यात रात्रीही तापमानात विशेष घट होत नसल्याने उकाड्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणारे कामगार यांना याचा फटका बसत आहे. दरम्यान, रविवारी फलटणचे कमाल तापमान ४२.९ अंश, तर किमान तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, विनाकारण घराच्या बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोट -
मागील दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर गेला असून, ही परिस्थिती कायम राहणार नाही. तापमानात पुन्हा घट होऊन या महिन्याच्या शेवटपर्यंत तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र, नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करावे.
- डॉ. अभिजित जाधव, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT