बार्शी तालुका
PNE26W17705
बार्शी : दहावीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळविल्याबद्दल अभिनंदन नवले यास पेढा भरवताना आई-वडील.
मुलींची सरशी; जिल्ह्यात अव्वल निकाल ९४.७२ टक्के
मुलांचा उत्तीर्ण टक्का ९३.२६, तर मुलींचा ९६.८०; सिल्व्हर ज्युबिलीचा डंका
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ८ : दहावीच्या परीक्षेत बार्शी तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला असून, तालुक्याचा निकाल ९४.७२ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, सुलाखे हायस्कूल आणि महाराष्ट्र विद्यालयाचा निकाल ९६ टक्के लागला आहे. तालुक्यातील ३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
बार्शी शहर व तालुक्यातून ३ हजार ४८१ मुले आणि २ हजार ४३३ मुली असे एकूण ५ हजार ९१४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३ हजार २११ मुले आणि २ हजार ३३६ मुली असे एकूण ५ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा उत्तीर्ण टक्का ९३.२६, तर मुलींचा ९६.८० इतका आहे.
सुलाखे हायस्कूलमधील अभिनंदन चंद्रकांत नवले याने ९९.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. सुलाखे हायस्कूलमधील तब्बल ४७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
सिल्व्हर ज्युबिली प्रशालेतील समृद्धी संतोष उकिरडे हिने ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. अथांग गणेश ऐनापूरे याने ९५.२० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर श्रुती दत्तात्रय केवळे हिने ९५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला. चारे (ता. बार्शी) येथील कर्मवीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रगती गायकवाड हिने ९६.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. दिव्या अविनाश जाधव हिने ९५.२० टक्के गुण मिळवत द्वितीय, सोनाली रवींद्र जाधवर हिने ९४.६० टक्के गुणांसह तृतीय, साक्षी दादासाहेब जाधवर हिने ९४.४० टक्के गुणांसह चौथा, तर सचिन लक्ष्मण मुंडे याने ९३.२० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला.
३३ शाळांचा निकाल शंभर टक्के
सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, बार्शी, स्वामी विवेकानंद विद्यालय, माध्यमिक आश्रम शाळा खामगाव, कै. सी. एल. घोडके विद्यालय, मळेगाव, ममदापूर विद्यालय, ममदापूर, रणजितसिंह मोहिते-पाटील विद्यालय, झाडी, जय हनुमान प्रशाला, झरेगाव, नागनाथ प्रशाला, जामगाव, कै. लक्ष्मणराव डुरे पाटील प्रशाला, इर्ले, श्री हनुमान विद्यामंदिर, कव्हे, दिलीपराव सोपल विद्यालय, हळदुगे, छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळगाव, छत्रपती शिवाजी विद्यालय, बाभूळगाव, श्रीराम विद्यालय, धोत्रे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, गुळपोळी, भगवान बाबा विद्यालय, चुंब, आदर्श विद्यालय, रातंजन, शारदादेवी प्रशाला, वैराग, न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव, कासारी विद्यालय, कासारी, न्यू हायस्कूल, पिंपळवाडी, न्यू माध्यमिक प्रशाला, सरस्वती विद्यामंदिर, उकडगाव, जनाबाई जाधव प्रशाला, राळेरास, सरस्वती विद्यालय, नारी, दिलीप सोपल विद्यालय, सुर्डी, श्री बळवंतराव घाटे प्रशाला, यावली, कर्मवीर विद्यालय, चारे, विद्यामंदिर कन्या प्रशाला, वैराग, संत ज्ञानेश्वर विद्यालय, भातंबरे, तुळशीदास जाधव प्रशाला, वैराग, यशवंतराव चव्हाण प्रशाला, तडवळे आणि वखारिया विद्यालय, उपळे दुमाला या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.