पुणे

पाचगणी : नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी केली सीड बॉल्सची निर्मिती ; पाचगणीत कल्पकतेतून साकारली ''हरित क्रांती''ची बीजे

CD

​पाचगणीत साकारली ‘हरित क्रांती’ची बीजे

नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून सीड बॉल्सची निर्मिती

पाचगणी, ता. ८ : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पाचगणी गिरिस्थान नगरपालिका आणि हिलदारी यांनी राबवलेला उपक्रम येणाऱ्या पिढीला पर्यावरणाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. यामध्ये निसर्गरम्य पाचगणीला आणखी हिरवेगार बनवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सीड बॉल्सची निर्मिती करण्यात आली आहे.
येथील विद्यार्थ्यांनी माती आणि शेणखताच्या मिश्रणातून तब्बल ८०० पेक्षा अधिक सीड बॉल्सची निर्मिती केली. बीजगोळे हे कमी खर्चात आणि कमी मेहनतीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम मानले जाते. विशेषतः सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये जिथे मानवी हस्तक्षेप कठीण आहे, तिथे हे बीजगोळे पावसाळ्यात हरित डोंगर घडवण्यासाठी मैलाचा दगड ठरतील.
​केवळ वृक्षारोपणावर न थांबता शहराच्या स्वच्छतेचा विचार करून ‘हिलदारी’ने शालेय विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची शिस्त रुजवण्यासाठी मनोरंजक खेळांची मदत घेतली. ‘बिन इट टू विन इट’सारख्या उपक्रमातून मुलांनी खेळाखळातून कचरा व्यवस्थापनाचे धडे गिरवले. याचबरोबर टेबल लँड परिसरातून १३० किलोहून अधिक कचरा संकलित करून स्वच्छ पाचगणीचा संदेश देण्यात आला.
नगराध्यक्ष दिलीप बगाडे आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या संयुक्त उपक्रमाने पाचगणीच्या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेला एक नवी ऊर्जा दिली आहे. या उपक्रमासाठी उपाध्यक्ष प्रकाश गोळे, आरोग्य सभापती राजश्री सणस तसेच सर्व नगरसेवक यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, शहर समन्वयक ओंकार ढोले व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. हिलदारी टीमने परिश्रम घेतले.
----------------------------------
कोट

वाढते तापमान आणि निसर्गाचा बिघडलेला समतोल पाहता, आता प्रत्येक नागरिकाने ‘पर्यावरण रक्षक’ होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे ८०० बीजगोळे भविष्यात पाचगणीच्या डोंगररांगांना अधिक हिरवेगार करतील. हा केवळ उपक्रम नसून पर्यावरणाप्रती असलेली आपली कृतज्ञता आहे.

- डॉ. मुकेश कुलकर्णी (पर्यावरण तज्ज्ञ)
------------------------------
07664
पाचगणी : सीड बॉल बनवताना नगरपालिका शाळेतील विद्यार्थी.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT