पुणे

पाचगणी : पाचगणी पोस्ट ऑफिसचा सावळा गोंधळ; कामाचा खोळंबा अन् रांगाच रांगा! ​रिकामा काऊंटर तरीही नागरिकांची प्रतीक्षा; कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे पर्यटकांच्या शहरात संतापाची लाट

CD

​पाचगणी टपाल कार्यालयात ग्राहकांच्‍या रांगा

अनागोंदी कारभार; गेल्‍या काही दिवसांपासून नागरिकांची साध्‍या कामांतही गैरसोय

पाचगणी, ता. ११ : निसर्गरम्य पाचगणी शहरात सेवासुविधांचा दर्जा सुधारण्याऐवजी सरकारी कार्यालयातील अनागोंदी कारभार वाढताना दिसत आहे. येथील मुख्य टपाल कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. स्पीड पोस्ट किंवा बिल भरण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची वेळ जनतेवर आली आहे. विशेष म्हणजे, कार्यालयात गर्दीचा ओघ वाढत असताना शेजारील काऊंटर मात्र रिकामा असल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट, रजिस्ट्रेशन पार्सल आणि टेलिफोन बिल भरणा यांंसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ एकच काऊंटर सुरू ठेवला जात असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. आम्ही सकाळपासून कामासाठी रांगेत उभे आहोत; पण काम पुढं सरकायला तयार नाही. दुसरा काऊंटर रिकामा असूनही तिथे कोणी कर्मचारी उपलब्ध नसतो, अशी संतप्त भावना एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.
​पाचगणी हे पर्यटन स्थळाबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘शैक्षणिक केंद्र’ ही आहे. देश- विदेशातील हजारो विद्यार्थी नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे पार्सल, शैक्षणिक कागदपत्रे आणि पालकांशी होणारा पत्रव्यवहार यासाठी टपाल कार्यालय हे मुख्य माध्‍यम आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी अपुरा कर्मचारी वर्ग असणे, हे शहराच्या लौकिकाला साजेसे नाही.
टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन कामात सुसूत्रता आणावी आणि नागरिकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रिकामा असलेला दुसरा काऊंटर तातडीने सुरू करून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक न केल्यास या असुविधेविरोधात तीव्र जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे.
.........................................
कामापेक्षा वेळेचे बंधन पाळण्‍यात स्‍वारस्‍य
कामाच्या व्यापापेक्षा ‘वेळेचे बंधन’ पाळण्यातच कर्मचाऱ्यांचा जास्त कल असल्याचे दिसून येते. दुपारी एक वाजण्यापूर्वी कामाचा निपटारा करण्याची घाई कर्मचाऱ्यांना असते; परंतु प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता नागरिकांची कामे रखडलेलीच राहतात. त्‍यामुळे सामान्य नागरिकांना ताटकळावे लागते. याचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
.........................................
फोटो :...........BHL26B07734
पाचगणी : टपाल कार्यालयात कामाच्या वेळेत रिकाम्या असलेल्‍या खुर्च्या.
.........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT