पुणे

प्रकाश बोगावत, पोलिस उपनिरीक्षक काळे यांना पुरस्कार

CD

भिगवण, ता. २७ : ‘‘येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींना आदर्श पुरस्कार देण्यात येत आहे, ही बाब समाधानकारक आहे. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेचे कार्य व परिसरातील व्यक्तींना गौरविण्याचा संस्थेचा उपक्रम स्तुत्य आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये आदर्श पुरस्कार वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव, सरपंच गुरप्पा पवार, उपसरपंच कपिल भाकरे, गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी, केंद्रप्रमुख शशिकांत गावडे, भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष निखिल बोगावत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, रवींद्र वांझखडे, अजिंक्य मांडगे आदी उपस्थित होते. या वेळी साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आदर्श जीवन गौरव पुरस्कार सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रकाश दीपचंद बोगावत यांना, राष्ट्रपतिपदक विजेते पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे यांना आदर्श भिगवण पुरस्कार तर मुख्याध्यापिका सुचेता साळुंखे व मुख्याध्यापिका पल्लवी वाघ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या वेळी सचिन बोगावत, अनिल काळे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे यांनी आभार मानले. डॉ. अमित खानावरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT