पुणे

पसुरेत जमिनीच्या हद्दीच्या वादातून फायरींग

CD

भोर, ता. १५ : भाटघर धरण खोऱ्यातील पसुरे (ता. भोर) येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून हॉटेल व्यावसायिक ब्रिगेडियर (निवृत्त) यांनी बंदुकीतून दोन राउंड फायर करत स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. १५) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिगेडियर हितेशपाल सिंग (निवृत्त) यांनी आपल्या कुंजवन रिसॉर्टला वीजपुरवठा करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीत अनधिकृतपणे खांब उभे केले. याचा जाब विचारण्यासाठी पसुरे व कर्नवडीतील शेतकरी सिंग यांच्याकडे गेले. त्यात पसुरेच्या बिऱ्हामणेवाडीतील अशोक बिऱ्हामणे, प्रकाश शेलार, शंकर बिऱ्हामणे, सोनबा बिऱ्हामणे, चंद्रकांत कुरुंगावडे व कर्नवडीतील श्री पवार आदींचा समावेश आहे. शेतकरी व सिंग यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी सिंग यांनी बंदुकीतून दोन राउंड हवेत फायर केले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले. ग्रामस्थांनी सिंग यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला.
घटनेची माहिती मिळताच भोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब पवार व उपनिरीक्षक अशोक खुटवड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांची समजून काढत सिंग यांना ताब्यात घेतले.
दरम्यान आचारसंहितेमुळे पोलिसांनी सर्व परवानाधारकांकडून शस्त्रे जमा केली. मात्र सिंग यांच्याकडे बंदूक कशी? असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला. त्यावर पोलिस चौकशी करत आहेत.

‘‘हितेशपाल सिंग यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील बंदुकीची चौकशी सुरू आहे.’’
- अण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक, भोर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT