पुणे

भोरच्या श्रावणी, स्वराची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

CD

भोर, ता. ३० ः तालुक्यातील दोन मुलींची महाराष्ट्र राज्याच्या १५ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. भोर शहरातील श्रावणी रावळ आणि अंबाडे (ता. भोर) येथील स्वरा गाडे (गुरव) या दोघींची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुलींच्या १५ वर्षाखालील संघाचे सामने केरळ येथे होणार आहेत. यामध्ये सर्व राज्याचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.
या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट मंडळ यांचा महाराष्ट्र संघ सहभागी होत आहे. हा संघ निवडताना प्रथम साखळी सामने खेळविण्यात आले. सर्व सामने झाल्यावर त्यामधून महाराष्ट्राचा संघ तयार केला गेला. यामध्ये राज्यभरातून सहभागी झालेल्या सुमारे ५० संघांच्या ७५० खेळाडूंमधून श्रावणी व स्वरा यांची निवड झाली. या दोघीही चार वर्षांपासून क्रिकेटची प्रॅक्टीस करत आहेत. त्यांना भोरमधील तारू क्रिकेट अॅकॅडमीचे विश्वजीत तारू, पुणे येथील ब्रिलियंट क्रिकेट ॲकॅडमीचे नितीन सामल आणि खेड शिवापूर येथील पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अॅकॅडमीचे राजू मुजावर यांनी मार्गदर्शन केले. श्रावणी ही भोरमधील राजगड ज्ञानपीठाच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर स्वरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथे इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. एक वर्षापूर्वी स्वराच्या वडिलांचे निधन झाले असून तिने काकांकडे राहून हे यश मिळविले आहे. श्रावणीचे वडील हे खासगी कंपनीत कामगार म्हणून काम करीत आहे. दोन्ही मुलींसोबत त्यांच्या आई-वडिलांनी मुलींसाठी विशेष कष्ट घेतले आहेत. राजगड ज्ञानपीठचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे, सचिव स्वरूपा थोपटे, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रुबिना शेख, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, देगाव शाळेतील शिक्षक महेंद्र सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रावणी व स्वराचे अभिनंदन केले.
मुलींनी अहोरात्र घेतलेले कष्ट आणि त्यांना प्रशिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले आहे. मुलींच्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे, असे श्रावणीचे वडील राजेंद्र रावळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

Egyptian Treasure Theft : 3300 वर्षे जुना हार अन् अडीच हजार वर्षांपूर्वीची मांजरीची मूर्ती..; चोरीला गेलेला इजिप्शियन मौल्यवान साठा जप्त

गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार? IPL संघाने दिली मोठी ऑफर...

Pune News: गणेशखिंड रस्त्यावरील कोंडीमुळे मनस्ताप; विद्यापीठाजवळील यू-टर्न धोकादायक, नियमभंगामुळे अपघातांत वाढ!

Latest Marathi News Live Update : जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीत मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT