पुणे

मदतीचा हात पुढे करणाराच बनला ‘काळ’!

CD

शीतल बर्गे
बालेवाडी, ता. २३ : एटीएममधून पैसे काढण्यासाठी रविवारी (ता. २०) दुपारी बाहेर पडलेले गोपाळ वाघ (वय ६२) हे घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी ते हरवले असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केला. मात्र, जेव्हा ते मृतावस्थेत सापडले, तेव्हा अपघात करणाऱ्या रिक्षाचालकानेच मदत करण्याच्या बहाण्याने त्यांना निर्जन ठिकाणी टाकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बालेवाडी फाटा येथील कोटक महिंद्रा एटीएमजवळ रविवारी ही घटना घडली. रस्ता ओलांडताना गोपाळ वाघ यांना एका रिक्षाचालकाने धडक दिली. परिसरात लोकांची गर्दी जमा झाली. रुग्णालयात घेऊन जाण्याच्या बहाण्याने वाघ यांना घेऊन रिक्षाचालक निघाला. मात्र, त्यानंतर त्यांच्या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही.
दुसऱ्यादिवशी वाघ यांचा मुलगा अमित आणि कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू ठेवली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये रिक्षाचालकाने वाघ यांना रुग्णालयात नेण्याऐवजी थेट गणेशखिंड रस्त्यावरील रेंजहिल्स परिसरातील एका निर्जन ठिकाणी टाकल्याचे स्पष्ट झाले. अखेर सायंकाळी वडिलांचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २१) पोलिसांना अपघातात वापरलेली रिक्षा सापडली असून, रिक्षाचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. सहायक निरीक्षक अनिल केकाण तपास करीत आहेत.

माणुसकीला काळा डाग!
गोपाळ वाघ यांना अपघातानंतर तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचू शकला असता. मात्र मदत करणाऱ्याच्या रूपातील रिक्षाचालकाने भीतीपोटी अथवा अनास्थेमुळे त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी बेवारस अवस्थेत रस्त्यावर टाकून दिले. ही कृती फक्त अमानवी नव्हे, तर माणुसकीलाच काळिमा फासणारी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

Indapur News : क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Rain: २६ जुलैची बदलापूरकरांना पुन्हा भरली धडकी! नदीने गाठली पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

SCROLL FOR NEXT