BON25B01838
मोहोळ : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत वैशाली बिले यांना महिला तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र देताना उमेश पाटील. यावेळी उपस्थित डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व इतर पदाधिकारी.
---
राष्ट्रवादीच्या माळशिरस तालुका
महिलाध्यक्षपदी वैशाली बिले
सकाळ वृत्तसेवा
बोंडले, ता. २७ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माळशिरस तालुका महिला अध्यक्षपदी वैशाली ज्ञानेश्वर बिले यांची निवड करण्यात आली आहे. मोहोळ येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बिले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माळशिरस तालुक्याचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे, माळशिरसचे नेते रमेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शरद रूपनवर, माळशिरस तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, युवक तालुकाध्यक्ष अमित देशमुख, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अमोल वाघमोडे, ओबीसी तालुकाध्यक्ष दत्तात्रय ठवळे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पंकज जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
वैशाली बिले या ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे विचार व कार्य पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतील व पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीचे काम करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
वैशाली बिले या माळशिरस तालुक्यातील तोंडले- बोंडले येथील रहिवासी असून, त्या उमंग लोकसंचलित साधन केंद्राच्या सचिवा आहेत. महिलांना एकत्र करणे, बचत गट स्थापन करणे व गटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणात बिले यांचे मोठे योगदान आहे.