CHM26B03569
दिवी : येथे ‘एसआयआर’ मतदार नोंदणी कॅम्पला भेट देताना उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर.
----------
दिवी येथे ‘एसआयआर’ मतदार नोंदणी कॅम्प
उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांनी केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिमठाणे, ता. १५ : शिंदखेडा तालुक्यातील देगाव, दिवी आणि शेवाडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत आयोजित मतदार नोंदणी कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कॅम्पच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांनी बुधवारी (ता. १५) भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला.
या वेळी महसूल मंडल अधिकारी अनिता भामरे, तलाठी मनोज मंगळे, अशोक गिरनार यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कॅम्पमध्ये नागरिकांच्या मतदार नोंदणीसंदर्भातील शंकांचे तत्काळ निरसन करण्यात आले. तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून ईएफ अर्जांचे वाटप, स्वीकार आणि त्यांचे त्वरित डिजिटलायझेशन करण्यात आले.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनीही या जनजागृती उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कॅम्पला सामाजिक जनजागृतीचे स्वरूप प्राप्त झाले. कॅम्पमधील शिस्तबद्ध, पारदर्शक आणि गतिमान कामकाजाची दखल घेत उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांनी समाधान व्यक्त केले. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही मोहीम यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी सांगत संपूर्ण पथकाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.