चास, ता. २७ : डेहणे (ता. खेड) येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (ता. २२) नवउद्योजक शिबिर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिशा देण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी विकास मंडळांतर्गत झालेल्या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा संस्थेच्या सुरेखाताई मोहिते पाटील, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते पाटील होते.
प्रमुख वक्ते डॉ. बिपिन बनकर, डॉ. धन्यकुमार जैन, प्रा. पुरुषोत्तम राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर भागवत, उपप्राचार्य सिलदार पावरा, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. महेश रानवडे आदी उपस्थित होते. प्राध्यापिका अनिता मुळूक यांनी प्रास्ताविक, तर प्राध्यापक डॉ. राहुल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कविता तातळे यांनी आभार मानले.