वणवा लावणाऱ्यास पाच हजारांचा दंड
पाटण न्यायालयाचा निकाल; भोसगाव वनक्षेत्रात केली होती कारवाई
ढेबेवाडी, ता. १२ : वणवा लावून वनसंपदेला हानी पोहोचविणाऱ्या एकावर येथील वनविभागाने कारवाई केली. भोसगाव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी मराठवाडी (ता. पाटण) येथील एकावर मध्यंतरीच्या काळात गुन्हा दाखल झाला होता. पाटण न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबतची माहिती अशी; परिसरात वणवे लावण्याचे प्रकार वाढल्याने वनसंपदेचे नुकसान सुरू आहे. डोंगररांगा वणव्यामुळे काळवंडून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वणवे लावणाऱ्यांवर पथकाद्वारे नजर ठेवून कारवाईची मोहीम उघडली आहे. भोसगाव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी
अनिल पांडुरंग शिंदे (रा. मराठवाडी) याच्यावर वन कायद्यांतर्गत विविध कलमान्वये नुकताच गुन्हा दाखल केला. या घटनेत तीन हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. प्रसंगावधान राखत वनविभागामार्फत तत्काळ वणवा विझवण्यात आला. संशयितास पाटण न्यायालयाने पाच हजार दंड व दंड न भारल्यास सात दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, वनपाल शशिकांत नागरगोजे, वनरक्षक अमृत पन्हाळे, प्रशांत लव्हटे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
-----
कोट
---------------
जिल्ह्यात संपूर्ण वनविभागाच्या व लगत क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. ड्रोनद्वारे देखील वणवा लावणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. वन पथकाने गस्ती वाढविल्या आहेत. अशा प्रकारे संशयित पकडण्याची मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांनी अशा गैरकृत्यात सहभागी होऊ नये. वणवा लावणाऱ्यांची नावे कळविल्यास बक्षीस दिले जाईल.
- अमोल सातपुते,
उपवनसंरक्षक, सातारा
B08368
ढेबेवाडी : वणवा लावल्याप्रकरणी पकडलेल्या संशयितासमवेत वनविभागाचे पथक.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.