पुणे

उत्तर भारतातील धुक्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षेला ‘कवच’

CD

दाट धुक्यामध्ये रेल्वेला सुरक्षेचे ‘कवच’

उत्तर भारतातील दोन मार्गांवर प्रणाली कार्यान्वित

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ८ : हिवाळ्यामध्ये दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील रेल्वे वाहतुकीतील अडथळे व अपघाताचे धोके कमी करण्यासाठी रेल्वेने या मार्गावर ‘कवच’ या स्वयंचलित रेल्वे संरक्षण (ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन) प्रणालीच्या विस्तारास मंजुरी दिली आहे.
उत्तर भारतात हिवाळ्यात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वे संचालनात अडथळे निर्माण होतात आणि अपघातांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्रालयाने उत्तर रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गांवर स्वदेशी ‘कवच’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आळी आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३६२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, फिरोजपूर आणि जम्मू विभागातील जवळपास १,४७८ किलोमीटरवर ‘कवच’ प्रणाली बसविण्यात येणार आहे. फिरोजपूर विभागातील उर्वरित १,०१२ किलोमीटरवर सुमारे २४१ कोटी रुपयांच्या खर्चातून ही यंत्रणा उभारली जाणार आहे. तर जम्मू विभागातील जालंधर सिटी-जम्मू तावी-श्री माता वैष्णोदेवी कटरा, बटाला-पठाणकोट आणि बनिहाल-बारामुल्ला या मार्गांवरील ४६६ किलोमीटरवर सुमारे १२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या अंतर्गत रेल्वे मार्गांलगत स्थायी ‘कवच’ प्रणाली बसविण्यात येणार असून ४० मीटर उंचीचे कम्युनिकेशन टॉवर आणि अँटेना या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. ‘कवच’ ही भारतात विकसित करण्यात आलेली स्वदेशी सुरक्षा प्रणाली असून, आपत्कालीन परिस्थितीत ती स्वयंचलित ब्रेक लावून रेल्वे अपघात टाळण्यास मदत करते. या प्रकल्पामुळे उत्तर भारतातील धुक्याच्या काळातही रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.

‘कवच’चे फायदे
- दोन रेल्वेंमधील धडक टाळणे
- कमी दृश्‍यमानतेमुळे होणाऱ्या अपघातांना आळा
- दाट धुके, खराब हवामानात रेल्वे कार्यान्वित राहण्यास मदत


‘कवच’ची कार्यप्रणाली
- ‘कवच’ प्रणालीमध्ये इंजिन, सिग्नल यंत्रणा, लोहमार्ग आणि लोहमार्गांशेजारील टॉवरची मदत घेण्यात येते.
- इंजिनमधील उपकरण वेगावर लक्ष. रेल्वेने वेग वाढविला किंवा सिग्नल तोडला, तर आपोआप ब्रेक लावण्यात येतो.
- लोहमार्गावरील सेन्सरच्या मदतीने रेल्वेच्या वाहतुकींची नोंद.
- इंजिनवरील उपकरण व लोहमार्गांशेजारच्या टॉवरवरूनही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT