DO126B04206
दोंडाईचा : पंढरपूरसाठी बस रवाना करताना उद्योगजक सरकारसाहेब रावल, प्रवीण महाजन, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी आदी.
-----------
दोंडाईचाहून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस रवाना
पहिल्याच फेरीत ४० वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
दोंडाईचा, ता. १६ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दोंडाईचा आगारातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच फेरीत ४० वारकरी भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले. या बसला उद्योजक सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या वेळी नगरसेवक प्रवीण महाजन, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारसाहेब रावल म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. अनेक वारकरी पारंपरिक दिंड्यांसोबत पायी वारी करतात, तर ज्येष्ठ वारकरी एसटी बससेवेचा लाभ घेतात. त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. ७५ वर्षांवरील वारकऱ्यांना संपूर्ण मोफत प्रवास, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के सवलतीत प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांनी आरोग्याची काळजी घेत सुरक्षित वारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नगरसेवक प्रवीण महाजन यांनी सांगितले की, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून दोंडाईचा बस आगारासाठी ‘जिजाऊ’ आणि वातानुकूलित विजेवर चालणाऱ्या ‘शिवाई’ बस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच, लांब पल्ल्याच्या बससेवेसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शटल बससेवा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी म्हणाले, दोंडाईचा आगारातून पंढरपूर यात्रेसाठी किमान ४० प्रवासी एकत्रित झाल्यास त्यांच्या गावातूनच विशेष बसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच, दर्शनानंतर परतीच्या प्रवासातही भाविकांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नरेंद्र भाबड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश शिंगाणे, सहायक कार्यअधीक्षक सुवर्णा कळसकर, हंसराज ठाकरे, जगदीश पाटील, वाहन निरीक्षक रणजित बागूल, नरेंद्र गिरासे, आसावरी भामरे, देविदास रोकडे, श्रीमती गिरी, घनश्याम शर्मा, प्रवीण उमप, तानाजी सोनटक्के आदींनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.