पुणे

एमआरएफ टायर कंपनीच्या नव्या दालनाचे उंड्रीत उद्‍घाटन

CD

उंड्री, ता. २९ ः एमआरएफ कंपनीच्या नव्या दालनाचे उंड्रीमध्ये नुकतेच उद्‍घाटन करण्यात आले. विरालक्ष्मी टायर या नावाने हे अधिकृत दालन उघडण्यात आले आहे. त्याचे उद्‍घाटन एमआरएफ कंपनीचे क्षेत्र विक्री व्यवस्थापक रवी इतीगट्टी आणि जिल्हा व्यवस्थापक आल्फ्रेड जॉन्स यांच्या हस्ते झाले. यावेळी विरालक्ष्मी टायर्सच्या मालक अमृता जगताप, अथर्व सोलंकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
वाढते नागरिकरण, मुख्य मार्ग आणि येथे असणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची गरज याचा अभ्यास करून येथे हे दालन उघडण्यात आले आहे. वातानुकूलित असे उंड्री भागातील हे पहिलेच दालन आहे. ग्राहकाला स्वतः फिरून टायर पसंत करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनाचे स्वयंचलित पद्धतीने टायर बदलले जाणार आहेत. तसेच नामांकित गाड्यांची देखभाल- दुरुस्ती (सर्व्हिसिंग) अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीद्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘‘देशातील रस्ते सुधारत आहेत. त्यामुळे अनेक वाहन कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशात येत आहेत. या वाहनांची देखभाल दुरुस्ती जवळ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकाचे पैसा व वेळ दोन्हीची बचत व्हावी, हा कंपनीचा उद्देश असल्याने या ठिकाणी कंपनीचे अधिकृत टायर विक्री आणि देखभाल दुरुस्ती दालन सुरू करण्यात आले आहे,’’ असे कंपनीचे क्षेत्र विक्री व्यवस्थापक रवी इतीगट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

Fifa World Cup 2026 : ९० मिनिटं, पुतळ्यासारखा उभा राहतो हा माणूस; कोण आहे Michel Nkuka Mboladinga? तो असं का करतो? Video

Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT