पुणे

ब्रिजभूषण सिंह यांच्या निषेधात जोडे मारो आंदोलन

CD

पुणे, ता. ६ : भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत पुण्यातील वंदेमातरम् संघटनेतर्फे करण्यात आली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला काळे फासून, जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

वंदेमातरम् संघटनेच्या वतीने मंगळवारी बालगंधर्व चौकात, भारतीय महिला कुस्तीपटू यांच्या समर्थनात खासदार ब्रिजभुषण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या वेळी ब्रिजभूषण यांच्या प्रतिमेला काळे फासून, जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी ब्रिजभूषण यांची पक्षातून हकालपट्टी करावी, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद काढून घ्यावे, त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करावी, सत्तेचा गैरवापर करून कुस्तीपटूंवर दबाव आणला जातोय, अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसावर कारवाई केली नाही तर भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा वंदेमातरम् संघटनेतर्फे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी दिला. या वेळी महेश बाटले, मोहित काकडे, अमोल जगताप, अश्रू खवळे, संचित कर्वे, विनोद मोहिते, महानंदा राजघाटे, गोदाबाई ताकतोडे, वैशाली रणदिवे, सुकन्या जानराव, पुनम दास, संघटनेच्या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT