पुणे

जेवणानंतर सुस्ती की मस्ती?

CD

शिवाजीनगर, ता. ६ : नागरिकांची प्रशासकीय कामे करण्यासाठी उभारलेल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रमुख अधिकारी व कर्मचारी जेवणानंतर उपस्थित नसल्याने नागरिकांची कामे कशी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, प्रशासन अधिकारी, शाखा अभियंता, कर आकारणी अधिकारी, विद्युत विभाग या विभागातील प्रमुख अधिकारीच सोमवारी जेवणानंतर जागेवर उपस्थित नसल्याचे दिसले. संबंधित शिपायांना विचारले असता, अधिकारी येत आहेत, बाहेर गेले आहेत, कामानिमित्त महापालिकेत गेले आहेत, अशी विविध कारणे सांगण्यात आली.

१) तळ मजला
अ) कर आकारणी विभाग
- एकूण ८ कर्मचारी असताना फक्त एक उपस्थित
- इंटरनेट बंद असल्याने कामकाज सकाळपासून बंद
- अधिकारी वसुलीसाठी गेल्याचे सांगण्यात आले
- काउंटरवर एकही कर्मचारी उपस्थित नाही

ब) जन्म मृत्यू दाखले वितरण
- दोन कर्मचारी वेळेवर उपस्थित, नागरिकांची गर्दी
---------------------------------
२) पहिला मजला
अ) प्रशासन विभाग
- प्रमुख अधिकारी अनुपस्थित
- क्षेत्रीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विद्युत विभाग प्रमुख, शाखा अभियंता, हिरकणी कक्ष बंद, वृक्ष प्राधिकरण अल्प कर्मचारी

---------------------------------------
३) दुसरा मजला
अ) आरोग्य विभाग
आरोग्य निरीक्षक ,परिमंडळ आरोग्य अधिकारी क्र २, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक दहा पैकी तीन हजर, सफाई सेवक चार पैकी तीन हजर, विवाह नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT