पुणे

दंड रद्द करून रिक्षाचालकांना दिलासा द्या ः आमदार शिरोळे

CD

शिवाजीनगर, ता. ५ : वाहन फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्यास आकारला जाणारा दंड रिक्षाचालकांना परवडणारा नसल्याने तो रद्द करावा आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली.
रिक्षाचालकांना दरवर्षी वाहन फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे अनिवार्य असते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसे प्रमाणपत्र असणे हे गरचेचे आहे. पण नूतनीकरण वेळेत झाले नाही तर रिक्षाचालकांकडून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम वाढत जाते. कालांतराने दंडाची रक्कम भरणे अशक्य होते. त्यामुळे प्रमाणपत्राचे नूतनीकरण काही कारणांनी लांबत जाते, हे लक्षात घेऊन दंडच रद्द करावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
घराचा खर्च, रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण, आरोग्य अशा अनेक बाबींवर खर्च करत रिक्षाचालक कष्टाने संसार चालवत असतो, अशा स्थितीत फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणाचा दंड हा मोठा भार होतो. त्या दंडातून मुक्तता करून रिक्षाचालकांना दिलासा द्यावा, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Soft Skills: कॉर्पोरेट विश्वात केवळ 'डिग्री'ला महत्त्व नाही; मॅनेजमेंट विद्यार्थ्यांकडे 'सॉफ्ट स्किल्स' असणे आता अनिवार्य

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

SCROLL FOR NEXT